Pune : 142 खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे उद्या आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी (Pune) पक्षाच्या 142 खासदारांना संसदेच्या दोनही सभागृहातून बाहेर काढले. आणि त्यांचे निलंबन केले. लोकशाहीच्या या अपमानाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकाच्या विरोधात उद्या (शुक्रवार दि. 22 डिसेंबर) सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

Maval : पार्क केलेल्या ट्रेलरच्या टाकीतून चोरले 280 लीटर डिझेल

दरम्यान, या आंदोलनात मोदी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.