Talegaon : अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या (Talegaon)दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 8 डिसेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी रोडवर झाला होता.

सिद्धार्थ नाना गायकवाड (वय 38) असे मयत दुचाकीस्वाराचे (Talegaon)नाव आहे. याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि.20) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे त्यांच्या दुचाकावरून जात असताना त्यांना पाठी मागून अज्ञात वहानाने जोरदार धडक दिली. यात सिद्धार्थ हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान 16 डिसेंबर रोजी मृत्यू झाला.यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.