Pune : पावसाळ्यातील आपत्ती नियोजनासाठी सर्व प्रशासन कार्यालयात कंट्रोल रूमची निर्मिती

एमपीसी न्यूज – पुण्यात पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही (Pune) संकटांचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने कामांना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात बुधवारी (दि.31 मे) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शहरात पावसाळ्यात काही आपत्तीजनक परिस्थीती निर्माण झाली किंवा शहरात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली तर त्यावर काम करण्यासाठी सर्व प्रशासनामध्ये कंट्रोलरुमची निर्मीती कऱण्यात य़ेणार आहे.

या बैठकीला पुणे महापालिका, पुणे पोलीस, पी.डब्ल्यू.डी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, पीएमपीएमएल, पीएमआरडीए,महामेट्रो, स्मार्ट सिटी, टाटा मेट्रो अशा सर्व कार्यालयाकडील अधिकारी उपस्थित होते. हि बैठक पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रशासनाने घेतलेल्या या बैठकीत पुढील मुद्द्यांवर विशेषतः चर्चा करण्यात आली.

1)     वॉटर लॉगिंग पॉईंटस

2)     स्मार्ट सिटीच्या कामामुळे वॉटर लॉगींग ठिकाणे तयार करणे

3)     मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावरील राडारोडा हटवून पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत करणे

4)     उड्डाण पुलांच्या कामाचा आढावा

5)     ड्रेनेज लाईन व पावसाळी पाईप लाईन, पिण्याच्या पाईप लाईनची पावसाळ्या पुर्वी दुरुस्ती करणे

6)     ड्रेनेज ची तुटलेली झाकणे व रस्ता दुरुस्त करणे

7)     पुण्यातील आंबील ओढा, कोळेवाडी नाला, आंबेगाव नाला,जांभूळवाडी नाल्याची साफसफाई करणे

8)     पीएमपीएमएल च्या बसेसची दुरुस्ती करणे

9)     वाहतुकीच अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वेळीच अतिक्रमण हटवणे.

वरील विषय़ावर चर्चा करत पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुशंगाने पुणे पोलीस आयुक्त व पुणे महापालिका आयुक्त यांनी सर्व प्रशासनाला सुचना दिल्या. तसेच अचानक पाऊस झाला तर (Pune) आपत्कालीन परिस्थीतीत त्वरीत उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचा एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व प्रशासन कार्यालयात कंट्रोल रुमची निर्मीती कऱण्यात येणार आहे.तसेच सर्व विभागातील अधिकारी यांचा एक व्हॉटसअप ग्रुप तयार कऱण्यात येणार आहे .

याबरेबरच पावसाळ्यातील वाहतूक नियमना करीता पुणे महापालिका, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडील अतिरीक्त वॉर्डन वाहतूक शाखेस देण्याचेही आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.