Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. हि कारवाई मंगळवारी (दि.29) वडगाव -बुद्रुक येथील दांगट मळा येथे केली.

याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार संजय बरकडे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अमेय सुधाकर मारणे (वय 25, रा. दांडेकर पुल, पुणे) मंदार श्रीधर दारवटकर (वय 24 रा. वडगाव-बुद्रुक सोसायटी, पुणे) जयेश लक्ष्मण भुरुक (वय 22, रा.घबाडे वस्ती, वडगाव बुद्रुक,पुणे) राहुल मच्छिंद्र कांबळे (वय 22, रा.माणिकबाग सिंहगड रोड, पुणे) ऋतिक संभाजी वाघमारे (वय 21, रा.गोसावी वस्ती, वडगाव-बुद्रुक,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तसेच इतर एकजणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी यांनी बेकायदेशीररित्या एक गावठी पिस्टल, एक गावठी सिंगल बोअर कट्टा, एक एअर गन, एक कोयता असा एकूण 1 लाख 07 हजार किंमतीचे घातक शस्त्रे जवळ बाळगली होती. सर्वजण हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या पूर्ण तयारीत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.