Pune Crime : दागिन्यांची ऑर्डर पोहचविण्याआधीच कारागीर फरार

17 लाखांच्या दागिन्यांचा अपहार

एमपीसी न्यूज – कारागीराकडे बाहेरगावातील दागिन्यांची ऑर्डर पोहोचविण्याची जबाबदारी मालकाला महागात पडली आहे. संबंधित कामगाराने रोकड, दुचाकी आणि सोन्याचे दागिने मिळून 17 लाख 24 हजारांचा ऐवज घेऊन फरार झाला आहे.

ही घटना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान रविवार पेठ ते खरडानगर प्रवासामध्ये घडली आहे. याप्रकरणी कायेम शेख (वय 46, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायेम शेख यांचे रविवार पेठेत गोल्ड स्मिथ नावाचे दुकान आहे. त्या दुकानात एक कारागीर कामाला होता. मागील काही वर्षांपासून तो कारागीर दुकानात कामाला असल्यामुळे 19 नोव्हेंबरला कायेम यांनी त्याच्याकडे बाहेरगावातील सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्याने दागिन्यांची ऑर्डर न पोहोचविता कायेम यांना 17 लाख 24 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.