Chinchwad News : ‘वस्त्रकला’च्या स्पर्धेत रावेतच्या नेत्रा औटी प्रथम

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ‘वस्त्रकला’ या वस्त्रदालनाने दिवाळीनिमित्त महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महिलांना वस्त्रकला येथील साडी नेसून फोटो शेअर करायचे होते. त्यातून जास्त लाईक मिळतील त्या स्पर्धकाला दहा हजार रुपये किंमतीची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार होता. या स्पर्धेत रावेतच्या नेत्रा औटी यांनी सर्वाधिक लाईक्स मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नेत्रा औटी यांना पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर उपस्थित होत्या.

‘वस्त्रकला’ने दिवाळीनिमित्त महिलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महिलांना वस्त्रकला येथील साडी परिधान करून त्याचे तीन फोटो त्यांना पाठवायचे होते. हे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केल्यानंतर 23 नोव्हेंबरपर्यंत सर्वाधिक लाईक मिळणा-या विजेत्याला दहा हजार किंमतीची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार होता.

या स्पर्धेत एकूण 39 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी नेत्रा औटी यांनी सर्वाधिक लाईक्स मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नेत्रा औटी यांना पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वस्त्रकलाचे मालक सागर ताकवणे यांनी विजेता नेत्रा औटी यांचे अभिनंदन केले.

‘वस्त्रकला’ पैठणी आणि सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी शालू, हॅण्डलुम साडी, प्युअर येवला पैठणी, कॉटन सिल्क साडी, गडवाल सिल्क साडी, डिझायनर बॉकेट साडी, फॅन्सी डिझायनर साडी, कांजीपुरम सिल्क साड्या खात्रीशीर मिळतात. विविध व्हरायटी आणि खरेदीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वस्त्रकलाला एकवेळ आवश्यक भेट द्या, असे आवाहन सागर ताकवणे यांनी केले आहे.

संपर्कासाठी पत्ता – ‘वस्त्रकला’
चिंचवड स्टेशन जवळ,
कुणाल प्लाझा, शाॅप नंबर 70
संपर्क क्रमांक – 9604059999 / 9604069999

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.