Pune Crime : पती म्हणावा की हैवान; चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या गुप्तांगाला दिले हीटरचे चटके

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक निर्घृण प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचे हातपाय बांधून गुप्तांगाला हीटर गरम करून चटके दिले. इतकेच नाही तर हात पाय बांधलेल्या अवस्थेत असताना पत्नीसोबत अतिशय क्रूररित्या शारीरिक संबंध ठेवले. 35 वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 40 वर्षीय आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या त्यांच्या सोळा वर्षे मुलीचा मोबाईल पाहत होत्या. यावेळी आरोपी पतीने पत्नी कोणासोबत बोलत तर नाही ना असा संशय घेऊन तिला हाताला धरून बेडरूम मध्ये घेऊन गेला. फिर्यादींची चार मुले या संपूर्ण प्रकाराने घाबरून गेली. आरोपीने दरवाजा बंद करून फिर्यादीच्या सलवार आणि ओढणीने त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्यानंतर हीटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर त्याची चटके दिले. इतकेच नाही तर अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शरीर संबंध ठेवले.

आरोपीने पत्नीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य करत फिर्यादीच्या तोंडात स्वतःचा पाय घातला. इतकेच नाही तर अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर फिर्यादीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. दरम्यान मुली बाहेर जास्त आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने 16 आणि 11 वर्षीय मुलीकडे पाहून देखील अश्लील कृत्य केले.

Koyta Gang : “आम्ही इथले भाई, आज तुला खल्लास करतो”; सिंहगड रोड हद्दीत कोयता गॅंगचा पुन्हा राडा

या भयंकर कृत्यानंतर पत्नीने पोलीस स्टेशनकडे धाव घेत आरोपी पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.