Koyta Gang : “आम्ही इथले भाई, आज तुला खल्लास करतो”; सिंहगड रोड हद्दीत कोयता गॅंगचा पुन्हा राडा

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारासह राडा केला. 21 वर्षीय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने (Koyta Gang) वार करत त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. आम्ही इथले भाई आहोत म्हणत त्याने संपूर्ण परिसरात दहशत देखील माजवली. 1 मे च्या रात्री साडेआठ वाजता वडगाव बुद्रुक येथील तुकाई नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

रोशन काकडे, सद्दाम शेख, ओंकार लोहकरे, ओंकार गायकवाड, किसन गोंधळी यांच्यासह आणखी दोन ते तीन आरोपींवर (Koyta Gang) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी रोशन काकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पंकज रामदास तावरे (वय 21) या तरुणाने याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

Khed Court News : तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन; पोलीस पाटलाला 5 वर्ष सश्रम कारावास

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीच्या मित्राने आरोपीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी “अंड्या तुझा मित्र आहे ना, आज तुला खल्लास करतो” असे म्हणून धारदार हत्याराने फिर्यादीच्या मानेवर डोक्यावर आणि हातावर वार केले.

फिर्यादीचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याच्याही डोक्यात हत्याराने वार (Koyta Gang) करून जखमी करण्यात आले. फिर्यादीचा पाठीवर छातीवर लाथा बुक्क्याने मारहाण करून आम्ही इथले भाई आहोत आज तुला पण मारून टाकणार आणि तुझ्या मित्राला पण मारून टाकणार असे मोठमोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत वाजवली. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.