Khed Court News : तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन; पोलीस पाटलाला 5 वर्ष सश्रम कारावास

खेड न्यायालयाचा निकाल ; पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वांजाळे येथील प्रकार

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वांजाळे येथे चॉकलेटचे अमिष दाखवून तीन लहान मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस पाटलाला खेड न्यायालयाने (Khed Court News) पाच वर्षे सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे. 

गंगाराम नामदेव खंडे (वय 59) असे शिक्षा झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. खेड न्यायालयाने त्याला पाच वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा काल (मंगळवारी) ठोठावली. राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (Khed Court News) न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी हा निकाल दिला.

सुमारे सात वर्षांपूर्वी 14 सप्टेबर 2016 रोजी इयत्ता पाचवी व सहावीत शिक्षण घेणा-या मुलींपैकी सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीने गावाचे पोलीस पाटील गंगाराम नामदेव खंडे यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune Sex Racket : विमानतळ परिसरातील सॉलिटर बिजनेस हबमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गावातील इयत्ता पाचवीत शिकत असणाऱ्या दोन मुली व सहावीत शिकणारी एक मुलगी अशा तीन मुलींना  14 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी गावात राहत्या घरात चॉकलेटचे अमिष दाखवून बोलावून घेत त्या तीन मुलींशी पोलीस पाटील गंगाराम खंडे यांनी आश्लील चाळे केले होते.

ही घटना मुलींनी त्यांच्या घरी येऊन कुंटुबीयांना सांगितली. तिन्ही कुंटुबीयांसह पीडित मुलींनी खेड पोलीस स्टेशनाला येऊन फिर्याद दाखल केली.

त्यानंतर पोलिस पाटील खंडे यास अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून खंडे हा येरवडा कारागृहात होता.  हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात (Khed Court News) सुरू होता. त्याचा निकाल आज न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी दिला. या निकालाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.