Pune Sex Racket : विमानतळ परिसरातील सॉलिटर बिजनेस हबमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यातील 6 मुलींची सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यात विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सॉलिटर बिजनेस हबमधील अमायरा स्पा या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Pune Sex Racket) गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी या ठिकाणाहून वेश्याव्यवसाय (Pune Sex Racket) करणाऱ्या सहा तरुणींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मनीकंठ राहुल नायडू (वय 20, रा. अशोका सोसायटी थेरगाव), विशाल अग्रवाल, नितीन माने आणि एका महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित मुली या 19 ते 27 वयोगटातील असून पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील आहेत.

Pune Sex Racket : पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेट उध्वस्त; चार तरुणींची सुटका

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विमाननगर परिसरातील सॉलिटर बिजनेस हब येथील अमायरा स्पामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Pune Sex Racket) सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचला. आणि वेश्याव्यवसाय सुरू असताना रंगेहात पकडले.

आरोपी पीडित मुलींना मसाज सेंटरच्या नावाखाली अधिकच्या पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलीस निरीक्षक माळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.