Pimpri News : महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त प्रेरणा बँकेच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी प्रेरणा बँकेच्या वतीने वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रेरणा बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर, चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाइस चेअरमन सुरेश पारखी, संचालक श्रीधर वाल्हेकर, संजय पठारे, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, नंदकिशोर तोष्णीवाल, अजितकुमार जाधव, राजाराम रंदील, राजेंद्र शिरसाठ, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना गुजर म्हणाले की, कोणतीही संस्था नावारूपाला येण्यासाठी संघभावना महत्वाची असते. संचालक मंडळ, प्रशासन, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात समन्वय असेल, एकोपा असेल, आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असेल तर संस्था मोठी होते.

Pimpri News : एक वाढदिवस असा ही… शहरातील पुतळ्यांची स्वच्छा करत केला साजरा

या कार्यक्रमात महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असणाऱ्या दिंडी आणि पालखी सोहळ्याचे दर्शन कर्मचाऱ्यांनी घडवले. गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करण्यात आले.

याप्रसंगी संचालक संतोष मुंगसे, नाना शिवले, अजितकुमार जाधव यांनी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मेघनाद बोडस, किरण गायकवाड, प्रविण टेकवडे, विनोद कुसुंबेकर यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.विनय चंद्रात्रे यांनी बदलत्या आव्हानांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन केले.

श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रभागा भिसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किरण शेळके, संचीता जगताप, सविता कदम, जितेंद्र गाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.