Pune Sex Racket : पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेट उध्वस्त; चार तरुणींची सुटका

तीन दलालांना अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा (Pune Sex Racket) पर्दाफाश केला. पोलिसांनी या ठिकाणाहून चार तरुणींची सुटका केली तर काही दलालांना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील आहेत. तर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर हे पंचतारांकित हॉटेल आहे. या ठिकाणी सेक्स रॅकेट (Pune Sex Racket) सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. परराज्यातील तरुणींना या हॉटेलमध्ये खोली बुक करून देऊन आरोपी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांना मिळाली.

Chakan News : साईबाबा पतसंस्था निवडणूक; बोगस मतपत्रिका प्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान वेश्या व्यवसाय (Pune Sex Racket) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. आणि त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणांना बोलवण्यात आले. आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन तरुणी यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन तरुणी आणि तीन दलालांना येरवडा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.