Sharad Pawar : स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित रिक्षाचालकाचे शरद पवार यांना साकडे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी मागे घ्यावा, यासाठी पुण्यातील एका रिक्षाचालकांना चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित पवार यांना साकडे घातले आहे. 

संदीप काळे असे या रिक्षाचालकाचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता व शरद पवार (Sharad Pawar) यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो.

प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे.त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमा दरम्यान जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्व राजकीय पक्षातील नेत्यांसाठी शरद पवार यांचा हा निर्णय धक्कादायक ठरला.

Sharad Pawar : शरद पवार आपल्या निर्णयाचा करणार फेरविचार

त्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा. त्या पार्श्वभूमीवर राजीनामे देण्यास सुरुवात केली.

त्याच दरम्यान पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संदीप काळे या रिक्षा चालकाने शरद पवार यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. साहेब आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल आहे.

त्या पार्श्वभूमीवर संदीप काळे यांच्यासोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून एक रिक्षाचालक आहे. आजवर शरद पवार साहेबांना अनेक वेळा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून सामाजिक काम करण्यास ऊर्जा मिळत राहिली आहे. आजपर्यंत शरद पवार यांनी लाखो कार्यकर्ते घडवले असून त्यापैकी मी एक आहे.

काल अचानकपणे शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.तो माझ्यासह सर्वांनाच धक्का देणारा निर्णय ठरला.त्यानंतर रक्ताने पत्र लिहून आपल्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी निर्णय घेतला, असे काळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा. आपण अध्यक्षपदावर कायम राहावे आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करीत राहावे, असा मजकूर लिहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार नक्कीच निर्णय मागे घेतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.