Pune Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला व्हिडिओ टाकल्यामुळे अल्पवयीन मुलाचा मोडला हात

एमपीसी न्यूज – विरोधातील व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलाचा हात मोडला. ही घटना दोन दिवसांपूर्वी सकाळी अकराच्या सुमारास कसबा पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रमेश उर्फ गोट्या रायप्पा कोळी (वय 29) आणि प्रशांत यलप्पा कोळी (वय 23, दोघेही रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जाकिर इमाम भोलवाले (वय 47, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाकिर आणि  रमेश उर्फ गोट्या कसबा पेठेत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी जाकिरने मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रमेशच्या विरोधातील व्हिडिओ व्हायरल केला.

त्याचा राग आल्यामुळे रमेशने जाकिरचा पाठलाग करुन लाकडाच्या फळीने त्याला मारहाण करुन हात मोडला. याप्रकरणी फरासखाना पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.