Pune Crime News : बनावट ओळखपत्र, आधारकार्ड बनविणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – मिलीटरी इन्टीलीजन्स,लायझन युनिट यांनी अवैध मार्गाने घुसखोरी,समाजविघातक कृत्य करण्यासाठी तसेच लॅण्ड माफियांना व्यवहारासाठी बनावट डाक्युमेन्ट तयार करणारी टोळी कार्यरत असल्याचे पत्र पोलीस आयुक्तांकडून पत्र मिळाले होते. त्यानुसार कारवाई करीत एकाला अटक करण्यात आली आहे.

 

कल्पेश रमेश बोहरा याला सापळा रचून अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश याच्याकडून बनावट मतदान ओळखपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात लॅपटॅप, प्रिंटर, स्कॅनर, बनावट शिक्के बनविण्याचे मशिन, आठ मोबाईल, बनावट नावांची घेतलेली सिमकार्ड व बनावटरित्या तयार केलेले मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड,डेबिट कार्ड,बॅंक पासबुक, बनावट कागदपत्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

 

या प्रकरणात आत्तापर्यंत उमेश जगन्नाथ बोडके (प्रॅपर्टी एजंट), अमोल गोविंद ब्रम्हे (प्रॅपर्टी एजंट), सचिन दत्तात्रय जावळकर (प्रॅपर्टी एजंट),सय्यद तालीब हुसैन सय्यद जामिन हुसैन (रा. खामगाव, बुलढाणा), प्रदिप अनंत रत्नाकर (प्रॅपर्टी एजंट), मोहम्मद आसिफ मोहम्मद युनुस (रा. खामगाव, बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.