Pune Crime News : हॉटेलमध्ये जाऊ म्हणत प्रेयसीला कात्रज घाटात नेले अन्….

एमपीसी न्यूज – पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीला हॉटेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने कात्रज घाटात नेले अन् चाकूने भोसकून खून केला. रविवारी ही सदर घटना घडली.

सपना पाटील (वय 30) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून प्रियकर राम याला पोलीसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सपना आणि राम यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. रविवारी रामने सपनाला हॉटेलमध्ये जाऊ असे सांगून कात्रज घाटात नेले. तेथे गेल्यानंतर त्याने सपनासोबत वाद घातला आणि कात्रज बोगद्याजवळ गेल्यानंतर पोटात चाकू खुपसून खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.