Pune Crime News : भारती विद्यापीठ परिसरातून सव्वाचार लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज – घरामध्ये गांजा ठेवून त्याची विक्री करणार्या एकाला पोलीसांच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून चार लाख २३ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

 

याबाबत माहिती अशी – अमित प्रभाकर कुमावत (वय ३२ रा. गल्ली नं २, समर्थनगर, हिंगणे, सिंहगड रोड) येथे राहत होता. तो आपल्या घरातून गांज्याची विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.या माहितीच्या पोलीसांनी कुमावत याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना चार लाख २३ हजार ४०० रुपयांचे साहित्य सापडले त्यामध्ये २० किलो ९४० ग्रॅम गांजा सापडला. त्याची बाजारातील किंमत चार लाख १८ हजार ८०० रुपये इतकी होती.त्याशिवाय इलेक्ट्रॅनिक वजन काटा,प्लास्टिक पिशव्या याची किंमत एक हजार इतकी होते. त्याशिवाय गांजा पिण्याचे पेपर रोल बॅक्स त्याची किंमत ३६०० रुपये इतकी होती असे साहित्य पोलीसांनी जप्त केले.

भारती विद्यापीठ पोलीसांनी एन.डी.पी.एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.