Pimpri News : कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 5 ऑक्टोबर 2016, 6 ऑक्टोबर 2016 आणि 15 ऑक्टोबर 2016 रोजी मोरवाडी पिंपरी येथे घडली.

मिलिंद दिगंबर गोसावी (वय 42, रा. आंबेगाव, पुणे. मूळ रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक दत्तात्रय चव्हाण (वय 59, रा. एकतानगर, आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना कर्ज मंजूर करून देतो असे आश्वासन देऊन फिर्यादीकडून 21 लाख रुपये रोख आणि चेक स्वरूपात घेतले. त्यांना आजपर्यंत कोणतेही कर्ज मंजूर करून न देता त्यांची घेतलेली रक्कम परत न करता उडवाउडवीची उत्तरे देऊन आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.