Pune Crime News : केळीचे भाव कमी केले नाही म्हणून थेट टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे तोडले हाड 

एमपीसी न्यूज – केळीचे भाव कमी केले नाही (Pune Crime News) म्हणून थेट टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे हाड तोडले. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादातून ही मारहाणीची घटना समोर आली आहे.गोखलेनगर परिसरात ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

या घटनेबाबत केशव आंद्रे (21) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहा अज्ञात तरुणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime : टुरीस्ट व्हिसावर येऊन पुण्यात नोकरी करणाऱ्या पाच परदेशी महिलांवर हद्दपारीची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंद्रे हे मूळचे मुंबईतील घाटकोपरचे आहेत. ते पुण्यात गोखलेनगर या भागात केळी विक्रेता म्हणून व्यवसाय (Pune Crime News) करतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी पाच सहा तरुण फिर्यादी यांच्या केळीच्या हातगाडीवर गेले आणि केळी मागितली. भाव कमी करण्याची मागणी केली असता विक्रेत्याने नकार देताच या गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने त्यांना हाताने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत या तरुणांनी केळी विक्रेत्याच्या नाकावर मारले असता त्यांच्या नाकाचे हाड मोडले आणि त्यात ते जखमी झाले.

या प्रकरणी सहा अज्ञात तरुणांवर भारतीय दंडात्मक कलम 143,147,325, 148,149 अन्वये चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.