Pune Crime News : मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार पत्नीचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मांत्रिकाचा सल्ला घेत पत्नीचा छळ करणाऱ्या पती आणि त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केसनंद गावात हा प्रकार घडला.

22 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे. पती अजिंक्य जाधव व त्याच्या आई-वडिलांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जाधव व तक्रारदार यांचा एक वर्षापूर्वी विवाह झालेला आहे. त्यानंतर अजिंक्य माहेरूवरून पैसे घेऊन येण्यासाठी पत्नीचा छळ करत होता. मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच, त्यांना लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करत होता. दरम्यान, आरोपींनी घर, जमीन मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच पतीच्या शरीरिक समस्या लपवून ठेवत त्यांची फसवणूक केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.