Pune Crime News : पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल व जिवंत काडतुसासाह 21 वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या  युनीट 1 च्या तपासी पथकाने (Pune Crime News) अटक केली आहे. ही कारवाई पुण्यातील घोरपडे पेठ येथे शनिवारी करण्यात आली.

अभिषेक दिपक हजारे (वय 21 रा. जनता वसाहत, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

 

Pune News : टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कसबा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना खबर मिळाली की, घोरपडे पेठ येथे एकजण पिस्टलसह थांबला आहे. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल व मॅगझीन सापडले त्यात एक जिवंत काडतूस असा एकूण 61 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यावरून खडक (Pune Crime News) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास  सहायक पोलीस निरीक्षक आशिष  कवठेकर हे करत आहेत.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता 13 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.