Maharashtra Breaking News : राज्यपालांचा राजीनामा मंजूर.. रमेश बैस नवे राज्यपाल

एमपीसी न्यूज- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी (Breaking News) यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला असून राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.

कोश्यारी यांनी सप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल(Maharashtra Breaking News) म्हणून पदभार स्वीकारला होता.काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावे, अशी मागणी करत राज्यभरात विरोधकांनी गदारोळ उठविला होता. त्यानंतर खुद्द राज्यपालांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची (Maharashtra Breaking News) इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाची सुमारे बावणे बारा कोटीची फसवणूक

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. मूळचे रायपूरचे असलेले रमेश बैस हे  झारखंडचे 10 वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.