Pune News : टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा ( Pune News) मृत्यू झाल्याची घटना गंज पेठेतील मासे आळीत शुक्रवारी (दि. 10) घडली. अहमद मोहमंद शेख (वय 60, रा. नवाब मशिदीजवळ, गणेश पेठ) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

Pune News : नवले ब्रीजजवळ ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक

या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांचा मुलगा फिरोज (वय 37) यांनी या संदर्भात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहमद शेख गंज पेठेतील मासे आळी परिसरातून निघाले होते.

त्या वेळी भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर ( Pune News) जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक गिरिजा म्हस्के तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.