Pune News : नवले ब्रीजजवळ ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक

एमपीसी न्यूज – नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण ( Pune News ) जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी घडली.

याप्रकरणी पंकज महापात्रे (वय 57, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळवरून गृहोपयोगी साहित्य घेऊन अवजड कंटेनर निघाला होता . या कंटेनरचे नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर आल्यानंतर अचानक ब्रेक  निकामी झाले. चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.

Dapodi Crime News : दोघांचा खून करत रक्ताने माखलेला टिकाव घेऊन तो फिरत होता

तरीही  कंटेनरची समोर जात असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला धडक बसली.  यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.या अपघातात क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत उडाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम ( Pune News ) मारहाण केली.

पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.