Today’s Horoscope 12 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

12.02.2023.

शुभाशुभ विचार- 10 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस

राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – स्वाती.

चंद्र राशी – तुळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- हिरवा )  

कार्यक्षेत्रात आज काही अटीतटीचे प्रसंग सोडवावे लागतील. समोर येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कमी लेखू नका. काही अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची भक्कम साथ राहील.

वृषभ (शुभ रंग- तांबडा )

कार्यक्षेत्राध्ये ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रमांशिवाय दुसरा पर्याय नाही. नवीन व्यावसायिकांची येणी वसूल होतील. मामा मावशी कडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

प्रॉपर्टी चे व्यवहार तुमच्या फायद्यात राहतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. तरुणांनी बेफिकीर वृत्तीस लगाम घालावा. विरोधकांना तुमचे विचार आता पटू लागतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगली चालतील. नवोदित कलावंतांना प्रयत्न वाढवावे लागतील.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

रिकामटेकड्या चर्चेतून आज निष्पन्न काहीच होणार नाही. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. काम कमी व दगदग जास्त होईल. आज एखादा पत्ता शोधण्यासाठी भटकंती होईल.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी )

आज पैसा येण्याआधीच पैसा जाण्याचेही मार्ग तयारच असतील. नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आजचे प्रवास त्रासदायक होणार आहेत.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक अवघड कामे सोपी होतील.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा )

बेरोजगारांना घरापासून लांब रोजगाराच्या संधी चालून येतील. स्थावरच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेले बरे. व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली करा.

धनु- (शुभ रंग- लाल )

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते विरोधकांना पटवून द्याल. आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. मोठ्या भावाकडून तुम्हाला आज योग्य सल्ले मिळतील.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. तुमचा कामातील उत्साह विरोधकांनाही प्रभावित करेल. नोकरीत अधिकारी वर्गाचा तुम्हाला पाठिंबा राहील.

कुंभ (शुभ रंग – आकाशी )

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी आज तारेवरची कसरत करावी लागेल. आज झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. प्रामाणिक प्रयत्नांना मात्र आज यश नक्की मिळेल.

मीन -(शुभ रंग – मोतिया )

आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले उचला. गैरव्यवहार पचणार नाहीत  आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.