Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाची सुमारे पावणे बारा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – विक्रीला काढलेल्या बंगल्याच्या कागदपत्रांच्या (Pune Crime News) आधारे एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 11 कोटी 80 लाख रुपयांची फसणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अब्बास इब्राहिम कपाडिया (वय 70) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आर्थिक गुन्हे शाखेने मुद्रीक मर्चंट (रा. हडपसर) आणि परवेझ मुर्तूजा (रा. कोंढवा) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फरिदा मर्चंट, अबिद शेख, आयेशा, धनंजय राठोड, अस्लम मुजावर यांच्यासह साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या  कपाडीया यांनी बंगला विक्रीसाठी  काढला. यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन दलालांनी बँकेकडून 11 कोटी 80  लाखांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. कागदपत्रांच्या आधारे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करुन दलालांनी (Pune Crime News) गहाण खत तयार केले. बनावट कागदपत्रांचा वापर करुन बँकेकडून कर्ज मंजूर केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी बंगला मालकीचा असल्याचे भासवून विविध बँकांकडून गहाण खताचा वापर करुन कर्ज मंजूर करुन घेतले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कपाडिया यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक रुईकर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.