Pune crime News : शहरात घरफोड्याचे सत्र सुरूच, वारजे, लोहगावमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले घरफोड्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. चोरट्यांनी वारजे व लोहगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी वारजे व विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजेतील स्वर्णतीर्थ निवास येथे राहणारे अभिषेक शहाणे (वय 31) यांच्या बंद फ्लॅटच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. अभिषेक शनिवारी दुपारी कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यानंत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीचे गज कापून कपाटातून 1 लाख 82 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

अभिषेक परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यांनी वारजे पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे.

लोहगावमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 91 हजार रूपयांटा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला 27 नोव्हेंबरला कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या.

त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा कुलूप तोडून कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने असा 91 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.