Pune Crime : सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या शेजाऱ्याच्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : कामाला जाणाऱ्या (Pune Crime) आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने आपली तीन वर्षाची चिमुरडी सांभाळ करण्यासाठी शेजाऱ्यांकडे सोपवली होती. मात्र, या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले. पुण्याच्या हडपसर परिसरात 5 डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रशांत पडवळ (वय 45) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune : ‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील राज्यातून एक जोडपे हांडेवाडी परिसरातील एका सोसायटीत काही दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. नवरा बायको दोघेही (Pune Crime) काम करत असल्याने छोट्या मुलीला ठेवायचे कुठे? हा प्रश्न होता. मोठ्या विश्वासाने शेजारीच राहणाऱ्या पडवळ कुटुंबीयांकडे त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला सोपवले होते. मात्र, आरोपी प्रशांत पडवळ याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.