Pune Crime : खून करुन मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली झाकला

The murdered body was covered under a pile of stones:पोलिसांकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू

एमपीसीन्यूज : तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली झाकल्याची धक्कादायक घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमद परिसरात उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महंमद येथे हेवन पार्क नावाची जागा आहे. या परिसरात दगडाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून दगड बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. हा खून कोणी केला, कशासाठी केला आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, प्राथमिक तपासात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दगडाखाली झाकून ठेवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.