Pune : जेवणाच्या बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सवरुन ग्राहकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल स्पाइस फॅक्टरीमध्ये जेवणाच्या (Pune) बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सवरुन तूफान हाणामारी झाली. यामध्ये ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

हॉटेलच्या मॅनेजरने वेटरसह ग्राहकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हुजेफा अतरवाला हे आपल्या मैत्रिणीसह एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेवणाच्या बिलावर आलेल्या सर्विस टॅक्स बाबत त्यांनी हॉटेल मॅनेजरसोबत हुज्जत घातली.

तर या भांडणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला कर्मचारी अतरवाला याला शिवी देयची सुरुवात तुम्ही केल्याचे सांगताना दिसत आहे. यामुळे नेमक्या वादाची सुरुवात कोणी केली? हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Pune : मुळा-मुठा नदीत सापडला मृतदेह; काही दिवसांपूर्वी हरवलेल्या इसमाचा मृतदेह असल्याची शंका

यावेळी हुजेफा अतरवाला आणि मॅनेजर तसेच वेटरमध्ये वाद झाला. यावेळी अतरवाला (Pune) यांना काचेच्या बॉटलने तसेच काचेच्या बरणीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह इतर वेटरवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.