HSC SSC Repeater Exam : दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी

एमपीसी न्यूज – दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा (HSC SSC Repeater Exam) निकाल सोमवारी (दि. 28) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा 9 व 10 ऑगस्ट रोजी झाली.

20 जुलै आणि 28 जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शाळांना त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे 20 जुलै रोजीची बारावीची परीक्षा 11 ऑगस्ट आणि दहावीची 2 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तर 28 जुलै असलेली दहावीची परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

Pune : जेवणाच्या बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सवरुन ग्राहकाला बेदम मारहाण

या परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तिथे निकाल पाहून विद्यार्थ्यांना प्रिंट काढता येईल.

ऑनलाईन निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसा पासून गुणपडताळणी, पुनर्मुल्यांकन करण्यासाठी मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर (HSC SSC Repeater Exam) अर्ज करता येतील. अर्ज करण्याची मुदत 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.