Pune : मुळा-मुठा नदीत सापडला मृतदेह; काही दिवसांपूर्वी हरवलेल्या इसमाचा मृतदेह असल्याची शंका

एमपीसी न्यूज : पुण्यातील एस एम जोशी पुलाखालील मुळा-मुठा नदीत (Pune) एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला असून पोलिसांच्या वतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शी आत्महत्या केली असल्याचे समजत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. गेली दोन ते तीन दिवसांपूर्वी सेनादत्त पोलीस चौकी येथे एक इसम हरवल्याची तक्रार दाखल असून नागरिकांकडून हा तोच व्यक्ती असल्याचे सांगितल जात आहे.

Pune Crime : मित्रांनीच केला मित्राचा घात; मित्राचा खून करून पळालेल्या दोघांना 48 तासात अटक

आज सकाळच्या सुमारास पुण्यातील एस एम जोशी पुलाखाली नदीत एक मृतदेह आल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावर लगेच पोलिसांकडून घटना स्थळी धाव घेतली. अग्निशामक दलातील (Pune) जवान तसेच 700 ते 800 लोकांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणारे राजेश काची यांनी पुढे येत संबंधित मृतदेह बाहेर काढला. डेक्कन पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.