Pune Crime : मित्रांनीच केला मित्राचा घात; मित्राचा खून करून पळालेल्या दोघांना 48 तासात अटक

एमपीसी न्यूज : संकटकाळात मदत करणाराच (Pune Crime) खरा मित्र असतो.. ही म्हण आता दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे.. कारण हल्ली पुण्यातच मित्रच दुसऱ्या मित्राचा जीव घेताना समोर येत आहे. अशीच घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली. पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्रांनीच आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे घडली आहे. तर, मित्राचा खून करणाऱ्या तरुणांना 48 तासात पोलिसांनी अटक केली. 

शैलेंद्र मंडगीकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राम सुभाष श्रीरामे याला तुळजापूर येथून तर त्याचा मित्र गोपाल कोतलापुरे याला वाघोलीतील चोखीधानी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, श्रीरामे, मंडगीकर व कोतलापुरे हे तिघेही मित्र दोन दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणे झाली आणि दोघांनी शैलेंद्र याचा खून केला. त्यानंतर ते पळून गेले.

Pune : विष्णु बनकर यांना राष्ट्रीय स्तरावरील आयईआय यंग इंजिनिअर्स पुरस्कार प्रदान

पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असता श्रीरामे हा तुळजापूर येथे (Pune Crime) नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक तेथे पोहचले. तेथे त्याला अटक करण्यात आली, तर कोतलापुरे याला वाघोलीमधून अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.