Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांची पाणीपातळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त; पाणीसाठा 30 टक्के

एमपीसी न्यूज:  पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेञात सध्या चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. (Pune Dam Water Storage) चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी (9 जुलै) रात्रीपासून रविवारी (10 जुलै) सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांतील पाणीपातळी आता गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.7 टीएमसीने अधिक आहे.

 

रविवारी रात्री पासून ते सोमवार (11 जुलै) सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात 75 मिमी, वरसगाव धरण परिसरात 74 मिमी, पानशेत धरण परिसरात 85 मिमी आणि खडकवासला धरण परिसरात 18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune Dam Water Storage) सध्या खडकवासला धरण साखळी क्षेञात 8.70 टीएमसी म्हणजेच 29.25 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

 

Talegaon illegal liquor: तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून 13 हजारांची दारू जप्त

 

जुन महिन्यात पावासाने चांगलीच ओढ दिल्यामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. मात्र आता  पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.