Pune Traffic: मुसळधार पावसामुळे पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज: पुणे शहरात रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाचा फटका सोमवारी सकाळी येथील वाहतुकीवर झालेला दिसला. (Pune Traffic) पावसामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने रस्त्यावर आणल्याने शहरातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना सकाळी कामावर जाण्यास उशीर झाला.

 

शहरात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.  रविवारी रात्रीपासून माञ पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. (Pune Traffic) अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, मुसळधार पाऊस पडत असल्याने सोमवारी सकाळी बहुतांश नागरिकांनी चारचाकी वाहने नेणे पसंत केले. त्यामुळे बाणेर रोड, औंध रोड, गणेशखिंड रोड, खडकी येथील पुणे-मुंबई जुना महामार्ग, नगर रोडवरील वाघोली, येरवडा, सिंहगड रोड, सातारा रोड, सोलापूर रोड, चांदणी चौक, कर्वे रोडवर सकाळी 8.30 वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी दिसून आली. 

 

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांची पाणीपातळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त; पाणीसाठा 30 टक्के

 

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे आज सकाळी अंतर्गत  रस्त्यांवर देखील मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली.

 

स्वारगेट, सेनापती बापट रोड, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, बाजीराव रोड, खडकी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी चौक (एसपीपीयू) येथून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.