Municipal Hospital : महापालिका रुग्णालयात शासन दराप्रमाणे आकारणी; असे आहेत ‘नवीन दर’

एमपीसी न्यूज –  पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये  आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा (Municipal Hospital)  सुविधा आणि औषधोपचाराकरीता आता शासन दराप्रमाणे आकारणी केली जाणार आहे. महापालिकेने यासाठी धोरण निश्नित केले असून त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

शासनाच्या 20 नोव्हेंबर 2017 नुसार राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये आणि दवाखान्यातील औषधोपचार तसेच निरनिराळ्या वैद्यकीय सुविधांसाठी निर्धारीत केलेले सुधारीत दर हे महापालिका रुग्णालये आणि दवाखान्यांकरीता लागू करण्यात येणार आहेत. पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि इतर शासकीय रुग्णालयांमध्ये शासन दर आकारणी लागू आहे. त्या दरांप्रमाणे महापालिकेच्यावतीने दर आकारणी केली जाणार आहे.

असे आहेत नवीन दर!
नवीन केसपेपर फी पूर्वी 10 रुपये होते. आता 7 दिवसांसाठी 20 रुपये, जुना केस पेपर फी पूर्वी 10 रुपये होती. आता 20 रुपये, औषधांकरीता 5 दिवसांसाठी 10 रुपये होते. आता एक रुपयाही नसणार आहे. आंतररुग्ण शुल्क 30 रुपये कायम ठेवले. बेड जार्चेस – जनरल वार्डसाठी पूर्वीप्रमाणेच दिवसाला 30 रुपये ठेवले. अतिदक्षता विभाग (आयसीयू) पूर्वी प्रतिदिन 170 रुपये होते. आता प्रतिदिन 400 रुपये, साईड रुमसाठी प्रतिदिन 90 रुपये होते. आता प्रतिदिन 150 रुपये असणार आहेत.

सेमी प्रायव्हेटसाठी पूर्वी प्रतिदिन 90 रुपये होते. आता 300 रुपये असणार आहेत. ड्रेसिंगसाठी पूर्वी 10 रुपये चार्जेस होते. आता 20 रुपये असणार, प्लास्टर फी पूर्वी 90 रुपये होती, आता 55 रुपये असणार आहे. एक्स-रे साईजनुसार – 8×10 साठी पूर्वी 40 होते, आता 30 रुपये, 10×12 साठी पूर्वी 40 होते, आता 50 रुपये, 14×14 साठी पूर्वी 40 होते, आता 50 रुपये तर 14×17च्या एक्स-रेसाठी पूर्वी 40 होते, आता 125 रुपये फीस असणार आहे. सोनोग्राफी – एॅबडोमेन, पेल्विससाठी पूर्वी 90 रुपये होते. आता 120 रुपये शुल्क आकारणार आणि एॅबडोमेन आणि पेल्विससाठी पूर्वी 170 रुपये होते. आता 120 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, रुग्णवाहिकेसाठी पूर्वी प्रती 15 किलो मीटरपर्यंत 110 रुपये, त्यानंतर प्रती किलोमीटर करिता 10 रुपये शुल्क होते. आता प्रति किलो मीटरसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रतीक्षा शुल्क पूर्वी प्रती तास 30 रुपये होते. आता 8 तासांच्या पुढे प्रतीक्षा शुल्क प्रतीतास 100 रुपये असणार आहे.

 

Pune Traffic: मुसळधार पावसामुळे पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

 

महापालिकेचे  8 रुग्णालये आणि 29 दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य असल्याचा पुरावा सादर न करणा-या  रुग्णांकडून प्रत्येक वैद्यकीय शिर्षातील आंतररुग्ण बिलामध्ये महापालिकेमार्फत सध्याच्या दरानुसार 20 टक्के जादा फी आकारली जाते.   तसेच ओपीडी रुग्णांच्या बाबतीत वास्तव्याचा पुरावा आवश्यक नसतो, असे महापालिकेचे सध्याचे धोरण आहे. नव्या धोरणात त्याप्रमाणेच कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे.  शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता लागू करणे तसेच यापुढे वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणा-या सुधारीत  दरानुसार आयुक्तांच्या मान्यतेने नवीन दर लागू होतील.

Shiv Sena Meeting : शिवसेनेच्या बैठकीला 10 खासदारांची दांडी

 

शासनाकडील नियमानुसार सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ( उदा. गरोदर माता तपासणी, प्रसुती सेवा व प्रसुती नंतर मातेस, बालकास 30 दिवस सेवा, सिजरीयन सेवा, लहान मुलांचे लसीकरण, संदर्भ सेवा, गरोदर माता सोनोग्राफी व रक्त तपासणी, कोविड व इतर) आणि राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे तसेच दारिद्रयरेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा पुर्वीप्रमाणेच असतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कार्डधारक रुग्णास मोफत सुविधा दिली जाईल. परंतु जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाहीत फक्त अशाच रुग्णांना शासनाकडील दरांनुसार दर आकारणी केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सध्या सुरु असुन इतर रुग्णालयांमध्येही तशी सुविधा सुरु करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे.

महापालिकेची 4 रुग्णालये चोवीस तास सुरु राहणार

महापालिकेच्या वतीने थेरगाव रुग्णालय- 200 बेड्स, जिजामाता रुग्णालय- 130 बेड्स, ह.भ.प.कै.मल्हाराव कुटे रुग्णालय आकुर्डी- 130 बेड्स, व भोसरी रुग्णालय -100 बेड्स  नव्याने 4 रुग्णालये 24X7 सुरू करण्यात आले आहेत. तसेच शहरामध्ये 25 ठिकाणी जिजाऊ क्लिनीक, थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पीजी इन्स्टिट्युट येथे एम.बी.बी.एस. कॉलेज सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. अशाप्रकारे महापालिकेच्या आरोग्य सेवा सक्षम करण्याकामी कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाकडील नियमानुसार (ससुन रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे)  महापालिका दवाखाने आणि रुग्णालयामध्ये दर आकारणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार नवीन धोरण करण्यात आलेले असुन त्यास महापालिका महासभेने मान्यता दिलेली आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, तसेच कोणताही संभ्रम निर्माण होऊ देऊ नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.