Shiv Sena Meeting : शिवसेनेच्या बैठकीला 10 खासदारांची दांडी

एमपीसी न्यूज – सध्या शिवसेनेला धक्यावर धक्के बसत आहेत. आधी शिवसेनेच् तब्बल 40 आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यातच सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला तब्बल 10 खासदारांनी दांडी  (Shiv Sena Meeting) मारली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशा चर्चा सुरु होत्या.त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठकीला महत्व दिले जात होते. मात्र या बैठकीला लोकसभेच्या 10 खासदारांनी (Shiv Sena Meeting) दांडी मारली.

 

 

 

बैठकीला उपस्थित असलेले लोकसभेतील खासदार

गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, विनायक राऊत,धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे

राज्यसभा खासदार

संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी

 

दांडी मारलेले खासदार

भावना गवळी, राजेंद्र गावित, हेमंत जाधव,संजय मांडलिक, हेमंत पाटील, ओमराजे निंबाळकर, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, राजन विचारे, कलाबेन डेलकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.