Crime News : कान्हे फाटा येथील एटीएममधून 21 लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – मावळ परिसरातील कान्हे फाटा येथील ऍक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडून 21 लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या (Crime News)  दरम्यान घडली.

याप्रकरणी संदिप हिरासिंग जाधव (वय 35 रा.पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

Talegaon illegal liquor: तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून 13 हजारांची दारू जप्त

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हे फाटा येथील एक्सीस बँकेच्या एटीएम मशीनचे शटर (Crime News) उचकटून मशीनची तोडफोड करून मशीनमधील 21 लाख 22 हजार 900 रुपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी  पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.