Pune : दिलीप बराटे होणार नवे विरोधीपक्ष नेते

एमपीसी न्यूज – हडपसरच्या चेतन तुपे पाटील यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केल्यानंतर त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्याकडे देण्यात येणार आहे .

आज (मंगळवार) महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेता पदी दिलीप बराटे यांची निवड करण्यात आली आहे , मावळते विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे गटनेता पदी निवड झाल्याचे पत्र महापौरांकडे देण्यात येईल आणि महापौर मुक्ता टिळक त्यांची विपक्ष नेता पदी निवड जाहीर करतील .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.