Pune : पंजाबी पॉप गाण्यांचे सादरीकरण

हर्लीन सिंग याच्या नव्या पंजाबी गीतांचा अल्बम ‘सुवाया कर ना’

एमपीसी न्यूज  – पुण्यातील युवा गायक हर्लीन सिंग याच्या नव्या पंजाबी गीतांचा अल्बम ‘सुवाया कर ना’ बाणेर येथील म्युझिक्लब अकॅडमी मध्ये प्रसारित करण्यात आला. या वेळी हर्लीन याने त्याची गाजलेली पंजाबी पॉप गाणी सादर केली.या प्रसंगी अकॅडमीच्या संचालिका श्रुती जाकती आणि त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते.

हर्लीन सिंग आय.टी.इंजीनियर असून त्याचा स्वतःचा ‘पंजाबी बॉयीज’ नावाचा बँड आहे. चंडीगढ़च्या प्राचीन कला केंद्रातून संगीत विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या हर्लीनने सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचे बंधु जेष्ठ सूफ़ी गायक अमरजीत मेहंदी यांच्या कडून गायकीचे प्रशिक्षण घेतले आहे . दिल्ली,पंजाब तसेच परदेशातही मेहंदी बंधुंन सोबत त्याने गाण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हर्लीन यानी गायलेली सर्व गाणी युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली असून नुकताच प्रसारित झालेल्या ‘सुवाया कर ना’ गाण्याला सोशल मीडिया वर लाखभर लोकांनी पसंती दिल्याचं हर्लीनने सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.