Pune : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मतदार जनजागृती मोहिमेच्या शुभंकर चिन्हांचे अनावरण

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये अधिकाअधिक (Pune) नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, यादृष्टिने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे शुभंकर चिन्ह ‘एकी’चे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते.

Pune: मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मतदार जनजागृती करण्यासाठी शुभंकर चिन्ह असलेले सेल्फी स्टँड तयार करण्यात आले आहे. यावर प्रदर्शित ‘एकी’ नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशिलात बदल आदी माहितीही देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी दिवसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी स्वत: सेल्फी घेऊन (Pune) या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी दिवसे यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.