Pune : पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी ङॉ. श्याम अहिरराव यांची निवड

एमपीसी न्यूज -पुणे जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या सदस्यपदी ङाॅ. श्याम अहिरराव  यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नामनिर्देशित केलेले सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

डॉ. ए.बी. नांदापुरकर (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे व सदस्य सचिव जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती) यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रातील लोकांना वैद्यकीय उपचारासाठी लागणा-या मदती व  इतर मार्गदर्शनाकरीता ङाॅ श्याम अहिरराव हे नेहमीच सहकार्य करीत असल्याने या समितीवर निवङ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.