Pune : बॉलिवूड अभिनेत्रीकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या डॉक्टरला अटक

एमपीसी न्यूज- दिल्लीमधील एका नामांकित हॉस्पिटमधून निवृत्त झालेल्या डॉक्टरला बेकायदा सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली अटक केली. या कारवाईत पुणे पोलिसांनी दोन अभिनेत्रीची सुटका करून त्यांची सुधारगृहात रवानगी केली.

दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल मधील निवृत्त डॉक्टरकडून हिंदी व मल्याळी अभिनेत्रींची देहविक्री केली जात असताना पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे अटक कऱण्यात आली. दोन अभिनेत्रींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

डॉ. सुरेश कुमार सूद (वय 74, रा. 108, किंग्ज अपार्टमेंट, मीरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे फौजदार अनंत व्यवहारे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सुद हा दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाला आहे. तो हिंदी आणि मल्याळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या 24-25 वर्षांच्या दोन अभिनेत्रींकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीनुसार या दोन अभिनेत्रींना 10 हजार रुपयांची टोकन रक्कम देऊन पुण्यात आणण्यात आले. पोलिसांनी बंडगार्डन भागातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सापळा रचला. या हॉटेलमध्ये एक बोगस ग्राहक पाठवून त्यानंतर कारवाई करून या दोन अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. तर दलाल म्हणून काम करणाऱ्या डॉ. सूद याला वेटींगरुममधून अटक करण्यात आली. आरोपी सूद याला शुक्रवारी (दि. 31) न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

हा दलाल मुंबईतील शहनाज उर्फ सिमा या वेश्या व्यवसायातील महिला दलालासाठी काम करतो. ही महिला ओशिवारा, अंधेरी भागातील आहे. आरोपीचे वय जास्त असल्याने त्यावर कोणाला संशय येणार नाही म्हणून त्याच्यामार्फत व्यावसाय करून घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या कारवाईत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे सुरक्षा विभागाकडील पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनंत व्यवहारे आणि कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.