Pune : बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी तरुणीसह कुंटणखाना मालकिणीला अटक

एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगमध्ये बेकायदेशीररित्या भारतात येऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी तरुणीसह कुंटणखाना मालकिणीला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सपना मोस्तो सरदार (वय 25) असे या बांगलादेशी तरुणीचे नाव आहे. तर अप्पई मंडल या इसमालाही पोलिसांनी अटक केली. या दोघांकडेही पासपोर्ट नव्हता आणि त्यांनी बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला. तर या दोघांना घरात ठेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या लक्ष्मी लक्क्वा कांबळे या कुंटणखाना मालकिणीलाही पोलिसांनी अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.