Pune : मूकबधिर महिलेची व्हाट्सअप ग्रुपवर बदनामी, मूकबधिर आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका 43 वर्षीय मूकबधिर महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हाट्सअप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर टाकून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या मूकबधिर इस्माविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ई. के. नौशाद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या एका मित्राने तिला याविषयी माहिती दिली होती. व्हाट्सअप गृपमधील त्या मेसेजमध्ये पीडित महिलेच्या चरित्र्याबद्दल अतिशय वाईट मजकूर होता. ही महिला जेव्हा तक्रार देण्यासाठी आली, तेव्हा तिच्याशी संवाद साधणे अतिशय कठीण होते.

या महिलेशी संवाद साधण्यासाठी गुजराथी आणि इंग्रजी भाषेची जाण असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षिक आणि शिक्षिकेची मदत घेतली. त्यानंतर फिर्यादी महिलेशी सविस्तर संवाद साधून आवश्यक ती कारवाई केली. याचा अधिक तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.