Pune : भाऊ रंगारी गणपती मंडळाची दानपेटी चोरीला (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुण्यातील सुप्रसिद्ध भाऊ रंगारी गणपती मंडळाची दानपेटी दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 26) पहाटे 2 वाजून 31 मिनिटांनी घडली. विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडली.

चोरट्यांनी गणपती मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दानपेटी चोरून नेली. या प्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून त्यामध्ये दोन चोरटयांनी मोटारसायकलवरून येऊन मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी चोरून नेल्याचे आढळून आले आहे.

दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व अनंत चतुर्थीच्या दिवशीच सदरची दानपेटी सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.