Pune : ग्लोबल एज्युकेटर्स फोरमच्या प्रेसिडेंट पदी डॉ. रिता शेटीया

एमपीसी न्यूज –  ग्लोबल एज्युकेटर्स फोरम, न्यू दिल्ली (Pune) यांच्या तर्फे रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांची पुणे शहर प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बरोबर एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया यांची व्हॉईस प्रेसिडेंट आणि निवेदिता माझीरे यांची सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. रिता शेटीया यांना शैक्षणिक क्षेत्रातील दहा वर्षा पेक्षा जास्त अनुभव असून त्या करत असलेल्या सामाजिक कार्य उल्लेखनिय आहे. मला विश्वास आहे की, त्यांना सोपवलेली (Pune) जबाबदारी त्या पूर्ण मेहनतीने करतील आणि आजच्या युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन करतील. असे ग्लोबल एज्युकेटर्स फोरमचे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. बिरेन दवे म्हणाले. ते पुढे म्हणाले, डॉ. शेटीया आणि त्यांची टीमची निवड करून आम्ही आमच्या फोरममध्ये एक ॲक्टिव प्रेसिडेंटला जोडले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

डॉ. शेटीया म्हणाल्या की, आज मी जे काही केले आहे; त्या मागे माझ्या आई-वडिलांची मेहनत आहे. त्यांच्या मुळेच मी इथपर्यंत पोहचू शकले, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.