PMC : नव्याने समाविष्ठ गावांना 222 रुपयेप्रमाणे भरावा लागणार जाहिरात फलक शुल्क

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या हद्दीत 2017 पासून (PMC) 34 नवीन गावांचा समावेश करण्यात आला. याच भागातील जाहिरात फलक धारकांना 222 रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे शुल्क भरावा लागणार आहे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 22 डिसेंबर रोजी दिले आहेत.

महापालिकेच्या जुन्या हद्दीतील जाहिरात दरात 2013 पासून दरवर्षी 10 टक्के, तर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांमध्ये शहरातील जाहिरात दराच्या 50 टक्के दराने आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या शहरात जाहिरात फलकाचा प्रति चौरस फूट दर 576 रुपये, तर समाविष्ट गावांमध्ये साधारण 290 रुपये राहील, असा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता.

Pune : ग्लोबल एज्युकेटर्स फोरमच्या प्रेसिडेंट पदी डॉ. रिता शेटीया

मात्र, समाविष्ठ गावाच्या जाहिरात फलक शुल्काविरोधात उच्च (PMC) न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. या याचिकोवर 22 डिसेंबर रोजी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती गंगापूर वाला व न्यायमुर्ती चपळगावकर यांच्या खंडपिठाने सुनावणी करताना म्हटले की, याचिकाकर्त्यांनी संपूर्ण मागणी रक्कम भरण्याच्या अटीवर महापालिकेने कोणतीही कारवाई करू नये. तसेच याचिकाकर्त्यांनी महापालिकेच्या मागणीप्रमाणे आणि धोरणाप्रमाणे प्रती चौरस फुटाला 222 रुपये नवीन गावे पुण्याच्या हद्दीत समाविष्ठ झाल्यापासून म्हणजेच प्लॅनींग एथोरीटी म्हणून मान्यता अर्ज प्राप्त झाल्याच्या वर्षासाठी भरावे लाहगणार आहेत, असे आदेश दिले आहेत. यावेळी महापालिकेच्या वतीने अधिवक्ता अभिजीत कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. तसेच मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.