Pune : डॉ. गौरी ब्रम्हे यांच्या हस्ते बीएमसीसीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (स्वायत्त) (बीएमसीसी) वतीने ( Pune) आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लेखिका डॉ. गौरी ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘लोकांना समजेल-उमजेल असे लिखाण’ या विषयावर ब्रम्हे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. कुचेकर ग्रंथालय प्रमुख डॉ. आसमा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
ब्रम्हे म्हणाल्या, लेखनामध्ये सहजता, सातत्य आणि सर्जनशीलता या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मराठी भाषेमधून लिहिते व्हा. मराठी भाषेचे ज्ञान भारतात परदेशातून नोकरीनिमित्त  येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक आहे.
या परकीय नागरिकांना मराठी भाषेचे ज्ञान देणे ही एक करियर संधी ठरू शकते. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन 17  फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  सुरू  राहणार ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.