Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे मराठा उमेदवार

एमपीसी न्यूज – ब्राम्हण समाजाची असलेली नाराजी दूर करीत प्रा. मेधा कुलकर्णी ( Pune) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे मराठा समाजाच्या उमेदवाराला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने ब्राम्हण समाजाच्या उमेदवाराला पसंती दिली नव्हती. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला आमदारकीसाठी संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, काही नेते मंडळींनी विरोध कारून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नावाची शिफारस केली. आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या पोटनिवडणुकीत विजयी झाले.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा ; राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर

2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी प्रा. मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे या सुद्धा घटनेचा ब्राम्हण समाजातर्फे विरोध करण्यात आला होता. कोथरूड आणि कसबा मतदारसंघाच्या घटनांचा आढावा घेतला असता, आता प्रा. कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाजाची नाराजी काही प्रमाणात दूर झाल्याची कुजबूज सुरू आहे. येत्या काही महिन्यांतच पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघातील आहेत. त्यामुळे प्रबळ इच्छुक असलेले मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. कारण, ते सुद्धा कोथरूड मतदारसंघातील उमेदवार आहेत. शिवाजीनगरमध्ये वास्तव्य असलेल्या संजय नाना काकडे आणि वडगांवशेरीमध्ये वास्तव्यास असलेल्या जगदीश मुळीक यांना भाजप उमेदवारी देणार का, याची उत्सुकता लागली ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.